May 14, 2026 3:07 am

पुण्यातील रायसोनी विद्यापीठाच्या चित्रकला स्पर्धेत कलागुणांचे दर्शन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे: पुण्यातील जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीमध्ये स्थित ‘सामवेद आर्ट गॅलरी’ येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत शहरातील सर्वच वयोगटातील कलाकारांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. रंग आणि सर्जनशीलतेचे एक चैतन्यमय केंद्र असलेल्या या स्पर्धेला कलाकारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. विषय-आधारित या चित्रकला स्पर्धेत पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७० प्रतिभावान कलाकारांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर कलागुणांचा शोध घेणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. कलाकारांना त्यांच्या कलेच्या प्रत्यक्ष अनुभव तसेच रोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर, प्र कुलगुरू डाॅ. वैभव हेंद्रे, अधिष्ठाता अनिवाश काटे यांनी स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे – 

ए” ग्रुप

०१. स्वरा ए. कोथळे – पहिली (३०००/-)

02. शर्वरी एस. काकडे- 2रा (2000/-)

03. मनस्वी साळगावकर – तिसरी (1000/-)

०४. सिया चव्हाण- चौथा (अ) (२५०/-)

०५. स्वरा पाटील – चौथी (ब) (२५०/-)

०६. सात्विक गायखे – ५वी (अ) (२५०/-)

०७. अवनी जाधव – ५वी (ब) (२५०/-)

“बी” गट

०१. पूर्वा सी. खारकर – पहिली (५०००/-)

०२. नमिता जे. खाडिलकर – द्वितीय (३०००/-)

03. अदित्री मेनन – 3रा (2000/-)

०४. अनुश्री रसाळ – चौथी (अ) (५००/-)

०५. आरव भीमराजका -४था (ब) (५००/-)

०६. इरा काकडे – ५वी (अ) (५००/-)

०७. रुषिकेश आर. मितपल्ली – ५वी (ब) (५००)

“सी” ग्रुप

०१. रोहित खिरडे – पहिला (७०००/-)

02. रूपा एन. डावखरे – 2रा (5000/-)

03. वैष्णवी भोसले – 3री (3000/-)

०४. यश एस. मुळकुटे – चौथा (अ) (७५०/-)

०५. सुरभी डी. जाधव – चौथा (ब) (७५०/-)

06. प्रतीक ए. दोरगे – 5वी (अ) (७५०/-)

०७. प्रदण्या कुलकर्णी – ५वी (ब) (७५०/-)

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!