May 14, 2026 3:07 am

एमआयटी डब्ल्यूपीयूत इग्नीसिया-२०२६ हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- वास्तविक जगातील समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे आव्हान स्विकारुन ‘इग्नीसिया-२०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फिनटेक समस्यांवरील उपायांबद्दल मुंबईच्या ब्रॉन जीपी टीमला विजेतेपद तर उपविजेतापद एमआयटी डब्ल्यूपीयूच्या बिआँड बिट्स आणि द्वितीय उपविजेतापद कर्नाटकच्या मणिपाल युनिव्हर्सिटीच्या ट्रायस्टॅक ओव्हरफ्लोला मिळाले. या दोन्ही संघाने एसएमईओ२ आव्हानामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली.

‘विचार करा, निर्मिती करा आणि विकसित व्हा’ या घोषवाक्याखाली एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पॉलिटेक्निक व कौशल्य विकास विभाग आणि संगणक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इग्नीसिया-२०२६’ राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये विशेष कौतुक पुरस्कार लास्ट मिनिट चूस, नागपूर येथील वायसीसीई आणि पुणे येथील डीईएस विद्यापीठातील माइंड फ्रॉग या तीन संघांना देण्यात आले. त्यांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि एसएमई क्षेत्रांमधील समस्यांच्या निराकरणाबद्दल सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत पुणे, मुंबई सहित तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा मधील संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेत देशभरातील अत्यंत कुशाग्र विद्यार्थी संशोधक एकत्रित जमले होते. यांच्यासमोर वेळेची मर्यादा लक्षात ठेऊन वास्तविक जगातील समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे आव्हान ठेवण्यात आले होते. स्पर्धेत १८ तास आधिसमस्या विधाने जाहीर करण्यात आली होती. सहभागी टीमला एआय आधारित उपाययोजना विषयावर तयार करणे आवश्यक होते.

यामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, फिनटेक, शाश्वतता, स्मार्ट सिटी उपाययोजना आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी उपयुक्त साधनांचा समावेश होता. यामध्ये नाविन्य, तांत्रिक सखोलता, व्यावहारिक, उपयुक्तता आणि सादरीकरणाचा दर्जा यांसारख्या निकषांचा आधार घेण्यात आला.

या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे एक प्रतिष्ठित मंडळ उपस्थित होते. ज्यामध्ये वरिष्ठ संचालक स्वाती सादिनेनी या सन्माननीय अतिथी तर संजय पटवर्धन, अनीश नाथानी, सारंग कमलाकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजीचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, काॅम्प्युटर इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी विभागाचे कार्यक्रम संचालक डॉ. बी.एम.पाटील, पॉलिटेक्निक आणि कौशल विकास विभागाच्या कार्यक्रम संचालिका डॉ. रोहिणी काळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ज्योती मांटे, डॉ. शर्मिष्ठा देसाई आणि विद्यार्थी समन्वयक विवान माथूर उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!