May 14, 2026 7:12 am

आलं लसूण विकणारा सर्वसामान्य माणूस झाला चित्रपटाचा निर्माता

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आलं लसूण विकणाऱ्या नागपूरमधील एका सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेल्या रवी पंडित पवार यांनी आपलं आयुष्य एकदम साधं ठेवून मनोरंजन क्षेत्रात अभिनेत्रींचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या मुलींसाठी चक्क मराठी सिनेमा तयार केला आहे. “पिक्चर बॉईज” असे नाव असलेला हा चित्रपट येत्या १५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटांच्या स्वप्नमयी जगात गावातल्या दोन तरुणांचा प्रवेश होतो आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते अशा मनोरंजक कथासूत्रावर हा चित्रपट बेतला असून, चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. .

त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चौरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकारांची फळी चित्रपटात आहे.

चित्रपटाचा निर्माता होणे ही सर्वसामान्य माणसासाठी तितकी सोप्पी गोष्ट नाही. स्वतःची तेवढी परिस्थिती नसतानाही केवळ मुलीच्या स्वप्नापायी कुठेही न डगमगता, परिस्थितीशी दोन हात करून, केवळ कुटुंबाच्या पाठबळामुळे मी आज माझ्या लेकीचे स्वप्न पूर्ण केले आहे असे निर्माते रवी पंडित पवार यांनी सांगितले.

पिक्चर बॉईज या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय ही या चित्रपटाची खासियत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजनाचा गारवा अनुभवण्याची संधी पिक्चर बॉईज या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!