May 14, 2026 7:12 am

मिरारोडमध्ये कोट्यवधींचा माल असलेला ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाणिज्यिक स्तरावर एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी रासायनिक द्रव्ये आणि प्रयोगशाळेचे साहित्य जप्त केले असून, आतापर्यंत एकूण 13 कोटी 65 लाख 45 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तर 13 आरोपींना अटक केली आहे.मिरारोड येथील नयानगर भागातील छेडा आदर्श बिल्डिंगमधील एका घरावर 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:05 च्या सुमारास धाड टाकण्यात आली होती. या धाडीत श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी या महिलेच्या घरातून 1 किलो 324 ग्रॅम वजनाचे, सुमारे 2 कोटी 66 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

तपासात हे ड्रग्ज तिचा पती अरबाज वकील कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 यांच्याकडे वर्ग केला.

तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत एकूण 13 आरोपींना यामध्ये 11 पुरुष आणि 2 महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर मुंबईतील मालवणी आणि मनोरी परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. अटक करण्यात आलेल्या 12 व्या आणि 13 व्या आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी मालवणी सामना नगर आणि आजमी नगर, मनोरी, गोराई येथे छापे टाकले.

या कारवाईत एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे 255 लिटर रसायने आणि अत्याधुनिक उपकरणे जप्त करण्यात आली. यामध्ये सोडिअम हायड्रॉक्साईड पेलेट्स, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ॲसिटोन, डायक्लोरोमिथेन, मिथाईल अमाईन, क्लोरोफॉर्म ही रसायने व हिटींग ड्रायर, सेपरेशन फ्लास्क, हिटींग मॅन्टल रिकव्हरी फ्लास्क, फोर फिंगर क्लॅम्प, ॲडिशन पॉट, बुकनर फनेल ही उपकरणे आढळून आली. या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत एकूण 6 किलो 773 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात गुन्हे शाखा कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख , सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनीही या तपासात मोलाची भूमिका बजावली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!