May 14, 2026 7:23 pm

निदा खानला लपवणाऱ्या मतीन पटेलला 24 तासात मोठा दणका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आरोपी असलेली निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलढोझर चालणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या घरात निदा खान सापडली त्या घरावर कारवाई करण्यात येणार असून या संदर्भात महानगरपालिकेने नोटीस देखील लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक पोलिसांना गुंगारा देणारी टीसीएस धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला लपवण्यात छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याची भूमिका महत्त्वाची होती.

निदा खानला लपवण्यासाठी मदत केल्याप्रकरणी म तीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे, त्या मतीन पटेल याना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिला आहे. मतीन पटेल यांच्या घरावर आता बुलडोझर चालणार आहे, ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधले आहे त्या घराला महापालिकेने नोटीस दिली आहे. त्यांच्या घरावर महापालिकेने नोटीस लावली आहे.

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाच 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा दिला आहे. सोबतच त्यांचे नारेगाव परिसरातील दुसरे राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्यांच्या ऑफिसला ही अतिक्रमणाचा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळं आता मातीन पटेल विरोधात महापालिका ही आक्रमक झाली असल्याचे चित्र आहे.

नाशिकमधील बलात्कार, धर्मांतर, ॲट्रॉसिटी गुन्ह्यासह आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यानं आश्रय दिल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये संभाजीनगरचा MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

मतीन पटेल हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून एमआयएम पक्षात सक्रिय असून ते माजी खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान निदा खानच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने आश्रय देणे हे एक मोठे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचीही चौकशी करून त्यांना आरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी, एमआयएम हा अतिरेकी पक्ष असून या प्रकरणामागे राज्याला एका विशिष्ट विचारधारेकडे नेण्याचे मनसुबे आहेत, अशी टीका केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!