May 14, 2026 3:08 am

भोंदू खरातचा मुख्य साथीदार छोट्या गावात लॉजवर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात याचा साथीदार व बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित महेश भाऊराव आहेर (रा. कासारवडवली, जि. ठाणे) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील हॉटेलमध्ये पोलिसांना सापडला.

तो २० एप्रिल २०२६ पासून पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून त्याला अटक केली व रात्री उशिरा ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः आहेर ठाणे महापालिकेतून सहायक आयुक्त म्हणून निवृत्त झाला आहे. तो पीडित महिलेला भोंदूबाबा खरातच्या दरबारातही घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर पोलिसांकडून ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत जिल्ह्यातील लॉजिंग, हॉटेल्सची तपासणी सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक हातकणंगले तालुक्यात तपासणी करीत होते. नरंदे येथील हॉटेलमध्ये उतरलेल्या आहेरची माहिती पथकाच्या हाती लागली. पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेतले.

आहेर याने एका महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २०२० ते २०२३ दरम्यान घोडबंदर येथे घडला होता. तो खरातचा साथीदार असून त्याने या महिलेलाही खरातकडे नेले होते. तेथे जादूटोणा आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा तसेच त्याचे चित्रीकरण करून धमकी दिल्‍याचा आरोप त्याच्यावर आहे.

खरातविरोधात मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला. यानंतर पीडित महिलेने आहेरविरोधात एप्रिलमध्ये कासारवडवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यापासून आहेरचा फोन ‘नॉट रिचेबल’ होता. कर्नाटक, कोकणातील विविध भागात राहिल्यानंतर तो बुधवारी मध्यरात्री हॉटेलमध्ये दाखल झाला होता.

आहेर सहायक आयुक्त म्हणून निवृत्त झाला असला तरी त्याची कारकीर्द वादाने घेरलेली आहे. बनावट पदवी, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला, जावयाला मारण्याची धमकी यासह महापालिकेतील त्याची अनेक कामेही वादग्रस्त ठरली आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!