May 14, 2026 11:50 am

पुणे रेल्वे स्थानक पुनर्विकासाला वेग; १२ प्लॅटफॉर्ममुळे प्रवास होणार सुलभ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाने आता मोठी गती घेतली आहे. स्थानकाचा विस्तार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आक्रमक पावले उचलली असून, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या इमारतींचे पाडकाम आणि नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम एकाच वेळी वेगाने सुरू केले आहे.या विस्तारानंतर पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्मची एकूण संख्या 12 होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पुणे स्थानकाच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा जुन्या वास्तूंचा होता. पहिल्या टप्प्यात जुने डी.आर.एम. (संगम पार्क) ऑफिस आणि परिसरातील इतर प्रशासकीय इमारती पाडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या रिकाम्या जागेवर रेल्वे यार्डचे रिमॉडेलिंग करण्यात येत आहे. सोमवारी दै. ‌’पुढारी‌’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत जुनी बांधकामे पाडल्याचे आणि तेथील ढिगारे हटवून जागा समपातळीवर आणल्याची कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून आले.

सध्या रेल्वे प्रशासनाचे रिकाम्या केलेल्या जागेत नवे प्लॅटफॉर्म क्रमांक 11 आणि 12 बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यार्ड परिसरात सिमेंट मिक्सरच्या साहाय्याने प्लॅटफॉर्मचा पाया भरण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. सिमेंटच्या भिंतींचे बांधकाम आणि लोखंडी जाळ्यांचे काम पाहता, हे प्लॅटफॉर्म लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील, अशी चिन्हे आता दिसून येत आहेत.

पुणे स्थानकावर सध्या 6 मुख्य प्लॅटफॉर्म आहेत, मात्र गाड्यांची संख्या वाढल्याने त्यांची क्षमता अपुरी पडत होती. आता आणखी 6 नव्या प्लॅटफॉर्मची भर पडणार आहे. यामुळे गाड्यांना स्थानकाबाहेर सिग्नलसाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही आणि पर्यायाने रेल्वेचे वेळापत्रक अधिक अचूक होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!