May 14, 2026 12:44 pm

पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्.

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे.पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे गोळा गेले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे रिक्रिएशन करण्यासाठी नसरापूर येथील घटनास्थळी नेले होते. चिमुकली नेमकी कुठे खेळत होती, तिला कुठून सोबत घेतले आणि गाईच्या गोठ्यात कसे आणले, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी आरोपीकडून घेतली. आता ही सविस्तर माहिती आरोपपत्रात नमूद केली जाईल. या घटनेनंतर नसरापूरसह राज्यभरात संतापाचे वातावरण व्हावे. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा जमावाच्या हवाली करावे, अशी आग्रही मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आरोपीला लोकांसमोर नेण्याचा धोका पोलीस पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस काल मध्यरात्री कोणालाही सुगावा लागू न देता आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले होते. न्यायालयाने सध्या आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही तपास मोहीम राबवली. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीला सोबत घेऊन पोलीस नसरापूर येथील घटनास्थळी ठिकाणी पोहोचले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असून, घटनेच्या वेळी नक्की काय घडले असावे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोठ्यात नराधम कांबळेने संतापजनक कृत्य केलं, त्या गोठ्यामध्ये नेऊन पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली.

घटनेच्या वेळी आरोपी कुठे उभा होता, त्याने नक्की कशा प्रकारे गुन्हा केला, या सर्व बाबींचा पंचनामा पोलिसांनी घटनास्थळी केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला अन् आरोपीला गोठ्यात नेले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीवर हल्ला होऊ नये, याची खबरदारी देखील घेतली. यावेळी अख्खं गाव साखरझोपेत असल्यामुळे कुणालाच याची खबर लागली नाही.

कोर्टात फिर्यादी पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधि आणि न्याय विभागाला पाठविला आहे. यामध्ये तीन वकिलांची नावे पोलिसांनी सुचविली आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नाशिकचे अजय निसार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!