May 14, 2026 12:55 pm

पलाश मुच्छलवर सांगलीत गुन्हा दाखल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल याच्याविरोधात सांगलीत आणखी एक तक्रार दाखलं करण्यात आली आहेय फसवणूक आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही तक्रार भारतीय महिला क्रिकेटपट्टू स्मृती मानधनाच्या सांगलीतील बालमित्र आणि अभिनेता व निर्माता विज्ञान माने याने दाखल केली आहे. त्याच्या आरोपानुसार, पलाश मुच्छलने “नजरिया” या चित्रपटासाठी गुंतवणुकीचे आश्वासन देत त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. मात्र, संबंधित प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप माने यांनी केला आहे.

या आर्थिक वादासोबतच, विज्ञान माने यांनी अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) कायद्यांतर्गतही तक्रार नोंदवली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, या प्रकरणात त्याच्याशी अन्यायकारक वर्तन करण्यात आले असून त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पलाश मुच्छल याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने आपल्याविरुद्ध लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे सांगत, ही बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्याने तक्रारदाराविरोधात १० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!