May 14, 2026 3:46 pm

हॉटेलमध्ये जेवण मागणाऱ्या ग्राहकावर जीवघेणा हल्ला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरीतील साई चौक परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ मे) रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.

पिंपरीतील घटनेप्रकरणी अशिष जगन्नाथ वाळुंज (३०, नेहरुनगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास असादुन शेख (३०, पिंपरी), मोहंमद अजिज आशान शेख (२१, पिंपरी) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (३०, बौध्दनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेल बंद झाल्याचे वेटरने जोरात सांगितल्याने फिर्यादीने त्याला नीट बोलण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी स्वयंपाक करण्याच्या झाऱ्याने आणि इतर वस्तूंनी फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीने हातातील झारा हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!