May 14, 2026 3:46 pm

बापाने केला ९ वर्षाच्या मुलीचा खून, साडीमध्ये गुंडाळून पेटवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नसरापूर अत्याचार घटना ताजी असताना दौंड तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. देऊळगावराजे हद्दीत असलेल्या हनुमानवस्ती येथे नराधम बापाने नऊ वर्षाच्या अनामिकाच्या गळ्यावर आणि हातावर झाडे तोडण्याचे कटर मशीन फिरवून तिचा क्रूरपणे खून केला.

दरम्यान या मुलीला साडी मध्ये गुंडाळून तिला पेटवून दिल्याची घटना. रविवार (दि.३) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या अल्पवयीन मुलीचा अमानुषपणे खून केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शांताराम चव्हाण (वय ३३, रा. देऊळगावराजे,ता. दौंड ) याला अटक करण्यात आली आहे.मयत झालेली मुलगी आरोपीची पहिल्या बायकोची मुलगी होती. अनामिका ( वय ९) आणि तिचा भाऊ संस्कार (वय १०) यांचे शाळेचे निकाल लागले होते. तेव्हा अनामिकाने निकालातील क्रमांक मध्ये फेरफार केल्याच्या कारणावरून आरोपीने राहत्या घरात मुलीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!