May 14, 2026 3:47 pm

नसरापूर घटनेवरून राज ठाकरेंचा संताप; ‘फास्टट्रॅक’वरून सरकारचे टोचले कान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातल्या नसरापूरमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जातो आहे. या आरोपीवर कठोर करावाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

”पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

पुढे बोलताना त्यांनी सरकारचेही कान टोचले. ते म्हणाले, ”अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही”

या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?”, असा प्रश्नही राजा टाकरेंनी उपस्थित केला.या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? असंही ते म्हणाले.

ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं आहे. कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!