May 14, 2026 3:46 pm

तिघांशीही बायकोचे अनैतिक संबंध, दारु पाजली अन् मित्राला संपवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 मे रोजी सकाळी गावातील एका ट्यूबवेलवर मूळचंद उर्फ सोनू या फास्ट फूड विक्रेत्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मृताच्या तीन जवळच्या मित्रांना अटक केली असून, या हत्येमागील कारण ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. विशाल, दीपक आणि रिंकू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मितली नावाच्या गावातील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मूळचंद हा गावातच फास्ट फूडचे दुकान चालवत असे. विशाल, दीपक आणि रिंकू हे त्याचे जिगरी मित्र होते, मात्र त्याच वेळी या तिघांचेही मूळचंदच्या पत्नीशी अनैकित संबंध होते. आपल्या प्रेमसंबंधात मूळचंद हा अडथळा ठरत असल्याचे पाहून या तिघांनी त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला. ज्या मित्रांवर मूळचंदने जीवापाड प्रेम केले, त्यांनीच त्याच्या पाठीत खंजीर खुपसून अत्यंत क्रूरपणे त्याची जीवनयात्रा संपवली.

हत्येच्या दिवशी आरोपींनी मूळचंदला पार्टीच्या बहाण्याने गावातील एका ट्यूबवेलवर बोलावले. तेथे सर्वांनी मिळून तासनतास दारू आणि बिअर पिली. जेव्हा मूळचंद नशेत पूर्णपणे धुंद झाला आणि स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत राहिला नाही, तेव्हा तिघांनी मिळून जवळच पडलेल्या विटांनी त्याच्या डोक्यावर सपासप वार केले. विटांनी डोके ठेचल्यामुळे मूळचंदचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले, मात्र घटनास्थळी विखुरलेल्या बाटल्या आणि रक्ताळलेल्या विटांनी या क्रूरतेची साक्ष दिली.

घटनेची माहिती मिळताच एसपी सूरज राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि संशयावरून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला. एसपींनी सांगितले की, अनैतिक संबंधांच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी या मित्रांनी ही भीषण हत्या केली होती. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेल्या विटा जप्त केल्या असून तिन्ही आरोपींना तुरुंगात धाडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!