May 14, 2026 9:35 pm

जवान सुट्टीसाठी गावी आला, वाटेतच काळाचा घाला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

चार दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आलेल्या भारतीय सैन्यातील जवानासोबत दुर्दैवी घटना घडली. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात निपळण येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये 27 वर्षीय जवान गजानन नामदेव निकोडे यांना जीव गमवावा लागला.या मन हेलावणाऱ्या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जवान गजानन निकोडे हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. ते चार दिवसांच्या सुट्टीसाठी गावी आले होते. गुरुवारी ते कामानिमित्त कूर येथे गेले होते. तेथून काम आटोपून दुपारी 1.45 च्या सुमारास ते दुचाकीवरून परत गावी येत होते. तेव्हा निळपण येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली.

ट्रक आणि दुचाकीचा अपघात भीषण होता. यामध्ये जवान गजानन यांच्या डोक्याला मार लागला आणि जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यातील काहींनी त्यांना गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, निकोडे हे 2019 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. तर चार दिवसांपूर्वीच ते सुट्टीवर आले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!