May 15, 2026 12:05 am

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ मध्ये व पुणे महानगरपालिका प्रभाग क्र २० व २१ चे समवेत ड्रग्ज मुक्त प्रभाग- ड्रग्ज मुक्त, पुणे या अभियानाअंतर्गत कार्यक्रम बुधवारी (ता.२९) सायंकाळी बिबवेवाडी येथे पार पडला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हिडीओ व पोस्टरव्दारे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी तयार केलेल्या मोटार वाहनाचे उद्घाटन केले व ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे या सेल्फी पाँईट येथे फोटो काढले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गणेश शिंदे, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, मनोज पाटील अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, राजेश बनसोडे, अपर पोलिस आयुक्त, पश्चीम प्रादेशिक विभाग, मिलिंद मोहिते, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर तसेच पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्रीनाथ भिमाले, चेअरमन स्थायी समिती, राजेंद्र उर्फ आबा शिळीमकर, मानसीताई देशपांडे, मनिषाताई चोरबेले, प्रसन्नजीत वैरागे, तन्वी दिवेकर, गौरव घुले व सिध्दीताई शिळीमकर व सुमारे ७०० ते ७५० नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलिस उप आयुक्त परिमंडळ – २ मिलींद मोहिते यांनी केले. मनोज पाटील यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन वाहतुक, निर्मिती प्रतिबंध करण्यासाठी व त्याची माहिती पोलिसांना देणेकरीता, पुणे पोलिस आयुक्तालयाचे वतीने ड्रग्ज फ्रि पुणे हे मोबाईल अॅप विकसीत केले असून त्याचे लोकार्पण केले. याबद्दलची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.

श्रीनाथ भिमाले यांनी सध्या विविध माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करुन अंमली पदार्थांचा व्यापार केली जात आहे यामध्ये तरुण पिढी याच्या अंमलाखाली जाताना दिसत आहे. अंमली पदार्थ हद्दपार करणे ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही तर लोक प्रतिनिधी म्हणून आमचीही जबाबदारी आहे व पुण्याचा सुजाण नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. अंमली पदार्थाचे समुळ उच्चटन करणेसाठी पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा भविष्यात उत्कृष्ठ सोयी-सुविधा असतील परंतू याचा लाभ घेण्यासाठी निरोगी व्यक्ती नसतील अशी भिती व्यक्त केली.

गणेश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनावेळी कुटूंबप्रमुख म्हणून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते कि, आपली मुले काय करतात, त्यांचेशी संवाद साधला पाहिजे, अंमली पदार्थ सारख्या गोष्टींना नाही म्हटले पाहिजे. सशक्त समाज घडवितानाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. समाजव्यवस्था बिघडविणा-या

उपद्रवी घटकांवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे विघातक विचार नष्ट केले पाहिजे असे सांगीतले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये पुणे पोलिस आयुक्तांच्यावतीने पुणे शहरात ड्रग्ज मुक्त प्रभाग, ड्रग्ज मुक्त पुणे अभियान सुरु केले असून यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या व उपलब्ध पोलिस मनुष्यबळ यामध्ये मोठी तफावत आहे. याकरीता नागरिकांच्या सहभागाने सदरचे अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना ड्रग्ज फ्रि पुणे या मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती द्यावी, संबधीत इसमांवर कठोर कारवाई केली जाईल. पुणे पोलिस दल नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असते व भविष्यातही राहिल असे सांगीतले.

या कार्यक्रमादरम्यान पुणे शहर पोलिस दलातील नागरिकांचा जीव वाचवून तसेच फायरिंग केलेले आरोपी पकडून उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ४ पोलिस अंमलदार १) पोहवा राऊत, वाहतुक शाखा, २) पोशि अनिल शेलार, ३) पोशि मांगडे वारजे पोलिस ठाणे, ४) पोशि तलवारे चंदननगर पोलिस ठाणे यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रत्येकी रोख २५ हजार व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!