May 15, 2026 12:34 am

यवतला बेवारस वाहनांचा लिलाव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्याच्या ताब्यातील बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव बुधवारी (दि. 6 मे) सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या लिलावासाठी स्क्रॅप व्यावसायिक, इच्छुक बोलीदार तसेच पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यवत पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

यवत पोलिस स्टेशन हद्दीत विविध कारणांनी जप्त करण्यात आलेली तसेच दीर्घकाळापासून बेवारस अवस्थेत असलेली वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत.

या वाहनांची संख्या वाढत असल्याने तसेच जागेची अडचण निर्माण होत असल्यामुळे शासन आदेशानुसार या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाटस पोलिस दूरक्षेत्र, पाटस येथील आवारात हा जाहीर लिलाव पार पडणार आहे.

लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्यात येणार असून, नियम व अटींनुसारच बोली स्वीकारली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या स्क्रॅप दुकानदारांनी व इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यामध्ये स्क्रॅप परवान्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, अर्ज तसेच रु. 1 लाख रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे आवश्यक आहे. हा डिमांड ड्राफ्ट पोलिस निरीक्षक, यवत पोलिस स्टेशन यांच्या नावे असावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!