May 15, 2026 2:53 am

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्वीस्ट, पत्नी कल्पना खरातबाबत खळबळजनक माहिती समोर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोंदूबाबा अशोक खरातला महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणी अटक केल्यापासून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तीन-तीन पथकांकडून तपास सुरु आहे.परंतु, खरातची पत्नी आरोपी कल्पना खरात अजूनही पोलिसांना चकवा देत फरार आहे.

लूकआऊट नोटीस जारी होऊनही ती सापडत नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

31 मार्च रोजी शिर्डी पोलिसांत अवैध सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.यामध्ये अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातचाही समावेश होता. मात्र गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाली आणि तेव्हापासून ती पोलिसांना सतत चकवा देत आहे.तिला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.शिर्डी पोलिसांचे विशेष पथक,अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक आणि एसआयटी अशी तीन स्वतंत्र पथके तिचा शोध घेत आहेत. नाशिकमधील तिच्या घराची झाडाझडती,नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली.परंतु, कल्पना खरातचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान,पोलिसांनी तिच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी केली होती.मात्र तरीही ती पोलिसांच्या हाती लागत नसल्याने,तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान,अटकपूर्व जामिनासाठी कल्पना खरातने 4 एप्रिलला न्यायालयात अर्ज दाखल केला होता.याची सुनावणी दोन वेळा तहकूब झाली तर 26 एप्रिल रोजी याची सुनावणी पार पडली.

यावेळी खरात प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी राहाता सत्र न्न्यायालयात केला. सर्व व्यवहार पती अशोक खरातवर ढकलत कल्पना निर्दोष असल्याचा तिच्या वकीलानं युक्तीवाद मांडला. मात्र पोलिस तपासात जमीन व्यवहार,बँक व्यवहार आणि सावकारकीत तिचा सहभाग असल्याची बाजू पोलीस आणि सरकारी पक्षाकडून ठाम पणे मांडण्याल तिचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

या प्रकरणातील इतर आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेली कल्पना खरात फरार असल्याने तपासाची गती मंदावल्याचं चित्र आहे.एकीकडे पोलिसांची तीन पथके,दुसरीकडे आरोपीचा सततचा चकवा, अशा परिस्थितीत अखेर कल्पना खरात पोलिसांच्या हाती कधी लागणार? की तपास यंत्रणांना अजूनही ती असंच गुंगारा देत राहणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!