May 15, 2026 3:43 am

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, काय सापडलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत फुलचंद पानात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या बंटा गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात विष्णु रामरतन गुप्ता या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी नियमित गस्त घालत असताना त्यांना दिनदयाळ हॉस्पिटलजवळील एका निर्जन रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभा असलेला एक टेम्पो आढळून आला. हा टेम्पो बराच वेळापासून बेवारस अवस्थेत उभा असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टेम्पोच्या मागील दरवाजाची कडी उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या बेकायदेशीर व प्रतिबंधित बंटा गोळ्यांच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या गोळ्या फुलचंद पानात नशेसाठी वापरल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी अटक केली.

आरोपी विष्णु रामरतन गुप्ता याच्याकडून एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा अमली पदार्थाचा साठा शहरात कसा आणि कोणासाठी आणला जात होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!