May 15, 2026 3:42 am

विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळताच झिशान सिद्धीकी यांची पहिली मोठी प्रतिक्रिया

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये रात्री उशिरा बैठक यासंदर्भात सुरू होती.

रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवाऱ्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, अखेर अनेक मोठ्या घडामोडींनंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवाऱ्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. शेवटी झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिशान सिद्धीकी यांच्या नावाला पसंती दिली. सुरूवातीपासूनच विधान परिषदेच्या स्पर्धेत झिशान सिद्धीकी यांचे नाव सर्वात पुढे होते. शेवटी त्यांच्याच गळ्यात विधान परिषदेची उमेदवारी पडली.

विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्धीकी यांनी मोठे विधान केले. झिशान सिद्धीकी यांनी म्हटले की, माझ्यासारख्या युवकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी कायमच प्रयत्न करेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जास्तीत जास्त युवक जोडले कसे जातील याकरिता. अल्पसंख्यांक लोकांसाठी आवाज उठवेल.

मी खरोखरच आभार मानतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला संधी दिली. सुनेत्रा पवार यांनी मला म्हटले की, आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. मी खरोखरच त्यांचा खूप आभारी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचा मी आभारी आहे. यासोबतच माझे कार्यकर्ते, कुटुंबिय, माझी आई, बहीण यांचा सर्वांचा मी खूप जास्त आभार मानतो.

माझे वडील आणि अजित पवार यांचा आर्शिवाद मला आहे, ते वरून बघत आहेत सर्व. मी आज अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे सांगतानाही झिशान सिद्धीकी दिसले. आजही मला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी एका मुलाला संधी देतात तशीच मला त्यांनी संधी दिली. मी त्यांना आज आश्वासन देतो की, फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात मी युवकांना पक्षासोबत सोडण्यासाठी काम करेल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!