May 15, 2026 5:12 am

विधान परिषदेसाठी दानवेंना लागली लॉटरी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.

कालपर्यंत ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती. पण, आता दानवेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदारकी, खासदारकी १०० वेळा कुर्बान, असं स्टेट्स अंधारे यांनी ठेवलंय.

विधान परिषदेसाठी ठाकरे गटातून खुद्द उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल करावा असा आग्रह महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं. त्यामुळे अखेरीस अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दानवेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्हॉट्सअपला स्टेट्स ठेवून नाराजी व्यक्त केली.

आदित्य ठाकरेंनी आमदारकीसाठी उमेदवार म्हणून अंबादास दानवेंचं नाव जाहीर केल्यानंतर इच्छुक सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे, “आमदारकी, खासदारकी १०० वेळा कुर्बान’ असं कॅप्शन लिहून सुषमा अंधारे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या म्हणून काम करत आहे. ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका असेल किंवा कोणत्या प्रश्वांवर प्रहार करण्यासाठी सुषमा अंधारे सदैव समोर असतात. त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारासाठी सुषमा अंधारे यांचं नाव चर्चेत होतं. पण, आता अंधारे यांची संधी हुकली आहे.

तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं, असा आग्रह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केला होता. जर उद्धव ठाकरेंचं नाव समोर आलं असतं तर महाविकास आघाडीने उमेदवार दिला नसता. पण, आता अंबादास दानवे यांचं नाव समोर आल्यामुळे काँग्रेसकडून उमेदवार देण्याची हालचाल सुरू झाली आहे. विधान परिषदेला उमेदवार देणार, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!