May 15, 2026 6:59 am

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.या ‘मिसिंग लिंक’वर कोणत्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे, याबाबतची माहिती समोर आल्यानंतर आता ‘मिसिंग लिंक’ मार्गावरून किती वेगाने जाता येईल, याची एक नियमावली सरकारकडून जारी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बस यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवरील वेगमर्यादेबाबत एक अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार हलक्या चारचाकी वाहनांसाठी ताशी १०० किमी, तर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी मिसिंग लिंकवर १ मेपासून हलकी वाहने, बस, प्रवासी वाहनांना प्रवेश असणार आहे. तर मालवाहू वाहनांना तात्पुरते मिसिंग लिंकवर प्रवेशबंदी असणार असून या वाहनांना प्रवेश देण्याबाबत नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

‘मिसिंग लिंक’वर टप्याटप्याने वाहतूक अंमलबजावणी

– प्रथम टप्पा : (०१/०५/२०२६ ते ३१/१०/२०२६) – मालवाहू वाहनांना प्रवेश नाही. केवळ हलकी मोटार वाहने (LMV) व बसेस / प्रवासी वाहने (Buses & Passengers Vehicles).

– द्वितीय टप्पा : (०१/११/२०२६ पासून) – हलकी मोटार वाहने व बसेस/प्रवासी वाहने. सुरूवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

– विशेष निर्बंध : धोकादायक माल – ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ या मार्गावर पूर्णतः बंदी असेल.

– वेग मर्यादा : बोगद्यामधील वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी प्रति तास निश्चित करण्यात येत आहे. तसेच बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी प्रति तास करण्यात येत आहे.

दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही. सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!