May 15, 2026 6:59 am

मुंबईतील ‘lone wolf attack’ने महाराष्ट्र हादरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या चाकूबाजीची घटना म्हणजे, lone wolf attack असल्याचे सांगितले जाते. हा एक दहशतवादी हल्ल्याचा प्रकार असून, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

एका इमारतीत तैनात असलेले सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन यांच्यावर जैब जुबेर अन्सारी याने चाकूने हा हल्ला केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून जैब जुबैर अन्सारी (वय 31) याला अवघ्या दीड तासांत अटक केली आहे.

हल्लेखोर जैब जुबैर अन्सारी याने सुरवातीला सुरक्षा रक्षकाला नाव आणि त्याचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार केले. ठाणे दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हल्लेखोराला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे तपास सुरू केला आहे. न्यायालयाने त्याला चार मे रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हल्लेखोर जैब जुबैर अन्सारी हा कोणत्या कट्टरवाद्यांशी संबंधित आहे, याचा तपास केला जात आहे.

ही घटना 27 एप्रिलला पहाटे सुमारे 4 वाजता नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत, वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या अस्मिता ग्रँड मेंशनच्या साइटवर घडली. त्या ठिकाणी राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर तैनात होते.

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, 31 वर्षीय आरोपी जैब जुबैर अंसारी घटनास्थळी आला आणि दोन्ही गार्ड्सशी बोलताना अचानक चाकू काढून हल्ला केला. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले, तर सुब्रतो सेन यांना किरकोळ दुखापत झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. अवघ्या दीड तासांत त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे.

हल्लेखोर दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. पण पोलिसांकडून या चर्चांचं खंडण करण्यात आलं आहे. या हल्ल्यामागे कोणते मोठे षड्यंत्र किंवा संघटित साखळी आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विविध समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याशी संबंधितीचे कलम आहे.

या प्रकरणाला सांप्रदायिक वळण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांनी सध्या कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आणि घाईचे ठरेल, असे म्हटलं. तपास यंत्रणा आरोपीच्या पार्श्वभूमीचाही सखोल तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, तो गेल्या काही वर्षांपासून मीरा रोड परिसरात राहत होता आणि त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे. उशिरा रात्री फॉरेन्सिक पथकाने त्याच्या घरी जाऊन पुरावे गोळा केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!