May 15, 2026 7:59 pm

लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांसह एकुलता एक लेक दगावला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जालना जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून रोज नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक गावाजवळ रविवारी (दि. 26) सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे नळणी बुद्रुक आणि बरंजळा साबळे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

या अपघातातील मृतांमध्ये सुभाष कचरू साठे (वय 38, रा. नळणी बुद्रुक) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी (दि. 28 एप्रिल) होणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू असताना आणि लेकीला हळद लागण्याच्या आनंदाच्या क्षणांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचे वातावरण क्षणात शोकसागरात बदलले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसऱ्या दुचाकीवरील अनिल संतोष बोराडे (वय 23, रा. बरंजळा साबळे) याचाही या अपघातात मृत्यू झाला. अनिल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. जालना येथे न्यायालयीन काम आटोपून मित्रासोबत परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास साहेबराव साठे (वय 40) आणि सुभाष साठे हे नळणी बुद्रुककडून आपल्या गावी जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या अनिल बोराडे यांच्या दुचाकीची त्यांच्याशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील कलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यात शोक व्यक्त होत आहे. विशेषतः एका वडिलांचा मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मृत्यू झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. दोन्ही कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!