April 25, 2026 5:01 pm

गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 52 लाखांची फसवणूक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कमी गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल 52 लाख 72 हजारांना ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना 30 जानेवारी ते 2 एप्रिल 2026 कालावधीत नऱ्हेत घडली आहे.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने साबयर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईलधारक, लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला नऱ्हेत राहायला असून, 30 जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉट्‌‍सॲपद्वारे जाहिरात पाठवली होती. त्यामध्ये कमीत कमी गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला लिंक पाठवून डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला कमी गुंतवणुकीवर जादा नफा झाल्याचे दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून 52 लाख 72 हजार रुपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!