April 25, 2026 4:54 pm

जिवंत महिलेला कागदोपत्री ‘मृत’ ठरवून जमीन हडपण्याचा प्रयत्न

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताच्या नात्याला हरताळ फासणारा एक संतापजनक प्रकार बाणेर परिसरात उघडकीस आला आहे. एका जिवंत वृद्ध महिलेला चक्क कागदोपत्री ‌’मृत‌’ ठरवून, तिचा बनावट मृत्यू दाखला तयार करीत जमिनीवर स्वतःचे नाव लावण्याचा धक्कादायक पराक्रम पोटच्या मुलीने आणि तिच्या साथीदारांनी केला आहे.

याप्रकरणी सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड व दत्तात्रय संभाजीराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृणालिनी संजय निकम (वय 52, रा. पाषाण) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृणालिनी यांची आई अद्याप जिवंत असताना सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड आणि दत्तात्रय शिंदे यांनी संगनमत करून कट रचला. आरोपींनी आईचा खोटा मृत्यू दाखला तयार केला आणि तो खरा असल्याचे भासवून बाणेर येथील तलाठी कार्यालयात सर्व्हे नंबर 32/1अ/1/20 वेस्ट पोस्टजवळ बाणेर या जमिनीवर वारसनोंदीसाठी सादर केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीच्या आईच्या मालकीच्या प्लॉटवर बनावट फेरफार नोंदवून घेऊन सरकारची आणि आईची फसवणूक केली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!