भोंदू अशोक खरातचे प्रकरण गाजत पुन्हा एका बाबाचा प्रताप समोर आला आहेत. वैयक्तिक अडचणी, ताणतणाव यांचा फायदा घेत लोकांची आर्थिक फसवणूक असे किती बाबा अजून समाजात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असे प्रकार वारंवार उघडकीस येत असतानाही समाजातील अगदी उच्चशिक्षित मंडळींही या बाबांच्या नादी लागत असल्याने, बाबांचा सुळसुळाट झाला आहे. नव्याने उदयास आलेला भोंदूचा प्रकार सोलापूरच्या करमाळ्यातील आहे. व्यवसाय उद्योगात भरभराट आणायचे असेल तर पूजाअर्चा केली पाहिजे, असे सांगून भक्ताची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनोहर मामा भोसले असे या भोंदू बाबाचे नाव असून ज्याने स्वत:ची प्रतिमा प्रति बाळूमामा अशी केली आहे. मनोहर मामा आणि त्याच्या सहकाऱ्याने एका भक्ताकडे दोन लाख रुपयाची मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्ताने 50 हजार रुपये मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडे दिले. 50 हजार रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि एकाविरोधात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्ह्यातून मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
प्रति बाळूमामा अशी प्रतिमा तयार केलेले मनोहर मामा याची कारकीर्द वादग्रस्त आहे. मनोहर मामा भोसले यांच्यावर सोलापूरसह पुणे व अन्य ठिकाणी आहेत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मनोहर मामा भोसले अध्यात्मिक मठ चालवत होता. करमाळा आणि गाणगापूर येथे मनोहर मामा भोसले याचे मठ. आहेत. रोज हजारो भाविक या मठामध्ये येतात.
विशेष म्हणजे स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणून घेणारा मनोहर भोसले भक्तांचं रोगनिवारण करत असल्याचा दावा करत होता. त्यामुळे अनेकांनी दुर्धर आजार बरे व्हावेत म्हणून या मनोहर मामाकडे हजेरी लावली आहे. मामाची खासियत काही और होती त्याच्या आणि त्याच्या चेल्याच्या मोबाईलमध्ये राज्यातील बडे नेते मंडळी, अधिकारी यांच्यासोबत फोटो सेव्ह ठेवलेले असायचे. करमाळा तालुक्यातील उंदरंगाव सारख्या छोट्याश्या गावात दर अमावास्येला येणाऱ्या हजारो किमती गाड्या आणि त्यातून येणारी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मंडळी ज्या मनोहरमामा याला भेटायला यायची.










