नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आतापर्यंत त्याच्याविरोधात एकूण १९ गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातने पूजा करण्याच्या आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे.
याच्याच अधारे त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार देखील केला आहे. याबाबतचे काही व्हिडीओज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.
अशोक खरात मागील ३८ दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. त्याची एसआयटी, इनकम टॅक्स आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे सातत्याने चौकशी होत आहे. मात्र अशोक खरात पोलिसांसोबत चलाखी दाखवत आहे. मागील ३८ दिवसांपासून तो पोलिसांना गंडवत असल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रश्नाचं उत्तर अजूनही पोलिसांना मिळालं नाही.
खरं तर, ज्यावेळी अशोक खरात विरोधात सुरुवातीला लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झाले. तेव्हा पीडित महिलांनी अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप केले. यात सगळ्यात महत्त्वाचा आरोप म्हणजे अशोक खरात पीडित महिलांना कसल्यातरी प्रकरणाचं औषध द्यायचा. यानंतर महिलांना गुंगी यायची, याचाच फायदा घेत नराधम अशोक खरात त्यांच्या अब्रुचे लचके तोडायचा. या महिलांना अशोक खरात नेमकं कोणतं औषध द्यायचा? याचं उत्तर मात्र अद्याप पोलिसांना मिळालं नाही.
पीडितेवर अत्याचार करण्यापूर्वी तिला पाण्यातून गुंगी येतील असे कोणते पदार्थ दिले जात होते आणि या औषधांचा पुरवठा त्याला कुठून व्हायचा, या तांत्रिक मुद्द्यावर खरात अजूनही मौन बाळगून आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो खास ‘गजनी’ खास ट्रीक वापरत आहे. ‘गजनी’ चित्रपटाप्रमाणे तो आपल्याला स्मृतिभ्रंश असल्याचं नाटक तो करत आहे. याबाबतची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. शुक्रवारी अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं त्याला २६ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.










