April 21, 2026 11:02 pm

अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरण: आयनबद्दल 5 धक्कादायक खुलासे!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा भयान चेहरा आता समोर आला असून त्याने पैशांसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र विकल्याचं स्पष्ट झालं आहे.

अयानच्या रिल्समध्ये कारमध्ये दिसत असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरी करून विकलेल्या मिळालेल्या पैशाचे असल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरण्याचा छंद आयानला होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं.

आरोपींच्या मोबाईलमधून डाटा मिळवण्यात यश

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणामध्ये आरोपीकडून जप्त केलेल्या तीन मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दोन मोबाईलची फॉरेनची तपासणी अजूनही सुरूच, पोलिसांनी आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईल डाटामधून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो डिलीट केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपींची आर्थिक व्यवहाराची तपासणीही होणार आहे.

तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावतीच्या परतवाडाजवळ असलेल्या वझर डॅमवर एका तरुणीने सोमवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या तरुणीचा परतवाडामधील अयान प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही पोलीस तपास करणार आहेत. याच वझर डॅमवर अयान मुलींना भेटायला जायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे.

आज न्यायालयात करणार हजर…

परतवाडा लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, हुजेर खान सह काही आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे. या सर्व आरोपींना सात दिवसांची सुनावण्यात आली होती ज्याची मुदत आज संपत आहे. आरोपी अयान अहमदला पोलीस आज दुपारी अचलपूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत. आरोपींच्या सखोल चौकशीसाठी आणखी पोलिस कोठडी वाढवून मागणार आहेत. आज परतवाडा -अचलपूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. आठ दिवसात एकच पिडीत समोर आल्याने पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. न्यायालयात आरोपींचेही वकील बाजू मांडणार आहेत.

नागपुरमधील पीडितेने नोंदवली तक्रार

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील नागपूर येथील पीडिता पोलिसांसमोर आल्याची माहिती सोमवारी रात्री उशीरा समोर आली. पीडितेकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. नागपूर येथील पीडिता पोलिसांसमोर आल्याने या प्रकरणामध्ये पोलिसांना न्यायालयासमोर बाजू मांडण्यास अधिक मोठा आधार मिळणार आहे. घटनेतील एक पिडिता पोलीस ठाण्यात स्वत:हून तक्रार देण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे.

एसआयटी स्थापन

परतवाडा येथील अल्पवयीन मुलांवरील कथित अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि 36 जवानांचा समावेश असून, त्याचे नेतृत्व सहायक पोलीस अधीक्षक आणि अचलपूरचे एसडीपीओ, आयपीएस शुभम कुमार (आयपीएस) करत आहेत. तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!