April 21, 2026 9:32 pm

मुंबई- पुणे महामार्गावरील’ मिसिंग लिंक’चा मुहूर्त ठरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरलेला आहे. आता प्रवासी सुसाट प्रवास करतील. यामुळे आता वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. अधिककरून विकेंडमध्ये या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

या मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या 30 मिनिटांपर्यंत कापलं जाणार आहे.

मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला ‘या’ दिवशी होणार सुरु

मुंबई-पुणे महामार्गाच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मिसिंग प्रकल्प महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे, असा राज्य सरकारचा निर्धार आहे. या मार्गाचं काम हे अंतिम टप्प्यात असून सध्या लोड टेस्टिंगचं काम सुरु आहे. या मार्गामुळे प्रवाशांचा सोपा, जलद आणि सुकर प्रवास करणं सोयीचं असणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वरदान

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक म्हणजेच खोपोली-कुसगाव दरम्यान13:3 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वरदान ठरू शकतो.

या प्रकल्पाचा पहिला बोगदा ओलांडल्यानंतर 650 मीटर लांबीचा एक्स्ट्रा डोस्ड केबल स्टेट ब्रिज असणार आहे. तसेच लोणावळ्याच्या खालून जाणारा बोगदा असेल, ब्रिजच्या मधोमध दिसणारा रस्ता 305 मीटर इतका आहे. तसेच मिसिंग लिंकवर दोन मोठे बोगदे असणा आणि एक केबल स्टेड पूल असणार आहे. खासकरून मिसिंग लिंकचा प्रवास पावसाळ्याच अतिशय सुंदर असणार आहे. तसेच याच बोगद्याची रुंदी ही 23.5 मीटर असेल.

मिसिंग लिंकवरून जाण्यासाठी हलक्या वाहनांना प्रवास करता येणार आहे. पहिल्या 3 महिन्यानंतर अवजड आणि प्रवासी वाहनांना टप्प्याने परवानगी दिली जाईल, असं सरकारने सांगितलं. अशातच वाहतिकीची स्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

मिसिंग लिंकचा मार्क कसा असेल?

मिसिंग लिंकचा मार्ग मुंबईहून पुण्याकडे जाताना ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे-कळंबोली- एक्सप्रेसवे-खालापूर टोल-खोपोली एक्झिट-मिसिंगल लिंक-कुसगाव- पुणे असा असेल.

टोलसाठी द्यावे लागणार ‘एवढे’ पैसे

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वाहन धारकांना टोलसाठी 320 रुपये द्यावे लागतील. हा दर वर्षानंतर 18 टक्के वाढणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!