April 23, 2026 3:49 pm

*भंगार धंद्याच्या नावाखाली रेल्वे रुळांच्या बाजूला सुरु होते ड्रग्जचे रॅकेट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भंगार विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थांचा रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अड्डा उद्धवस्थ केला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल 22 लाख रुपयांच्या किंमतीचे हेरॉईन आणि गांजा जप्त केला आहे.तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक करण्याच आली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल 22 लाख रुपये किंमतीचे हिरोईन आणि गांजा जफ्त केला आहे. तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक केली आहे. नेरुळ सेक्टर 28 मधील रेल्वे पटरी जवळ राजू राठोड नावाचा व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार विक्रीच्या नावाखाली अमली पदार्थ विकत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलीस अधिकारी आणि 15 पोलीस अंमलदारांच्या पथकाने बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास नेरुळ सेक्टर – 28 मधील रेल्वे रुळालगतच्या संशयीत झोपडीवर छापा टाकला.

22 लाख रुपये किंमतीचा माल जप्त

यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत सदर झोपडीत तब्बल 22 लाख रुपये किंमतीचे 43.6 ग्रॅम हिरोईन तसेच 26 ग्रॅम गांजा आढळुन आला. पोलिसांनी सदरचा गांजा जफ्त करुन अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (18), राजेंद्र भीमा काळे (55), अनिता संजय पवार (29), राजू बाबू राठोड (28), शिवराम लक्ष्मण पवार (32), कमळाबाई बाबु राठोड (55), सुमन राजू राठोड (25) या 7 जणांना ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंगार दुकान अनधिकृत जागेत

अटकेत असलेला मुख्य आरोपीराजू राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नेरुळ पोलीस ठाण्यात मारहाण आणि चोरी आणि घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी विशाल आणि गंगा काळे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!