April 23, 2026 4:45 pm

*अमेरिकेत मृत्यू पावलेल्या जान्हवी कंडुलाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेली भारतातील विद्यार्थीनी जान्हवी कंडुला हिचा सिएटल शहरातील पोलिसांच्या भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही घटना घडली होती.

त्यानंतर २०२४ साली जान्हवीच्या कुटुंबियांच्या वतीने दक्षिण आशियाई समुदायाने पोलीस प्रशासनाविरोधात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूसाठी खटला दाखल केला होता. या खटल्यात आता कंडुला कुटुंबाला २० दशलक्ष डॉलर्स भारतीय चलनात २६२ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहेत. एवढ्या मोठ्या रकमेबाबत आता जान्हवीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवीच्या आई जी. विजया लक्ष्मी म्हणाल्या, या पैशांचे आम्ही काय करायचे, तुम्हीच सांगा? मुळची आंध्र प्रदेशच्या अडोनी येथील रहिवासी असलेली जान्हवी कंडुला पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी २०२३ मध्ये अमेरिकेला गेली होती. सिएटल कॅम्पसच्या नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून ती एमएस करत होती. ५ जानेवारी २०२३ रोजी ती कॅम्पसमधून पायी जात असताना पोलिसांच्या भरधाव कारने तिला चिरडले.

या अपघातानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले, त्यावरून अमेरिकेतील भारतीय समुदायात संताप निर्माण झाला होता. सिएटल पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसाच्या बॉडी कॅमेऱ्याचे चित्रण समोर आणले होते. ज्यामध्ये पोलीस या घटनेवर विनोद निर्मिती करत होते, तसेच जान्हवीच्या जीव कवडीमोल असल्याचे बोलत होते.

सिएटल शहरातील वकील एरिका इव्हान्स यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले, “जान्हवी कंडुलाचा मृत्यू हृदयद्रावक होता आणि शहराला आशा आहे की, या आर्थिक नुकसान भरपाईमुळे कंडुला कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. जान्हवीचे आयुष्य तिच्या कुटुंबासाठी, तिच्या मित्रांसाठी आणि आमच्यासाठीही अनमोल असे होते.”

त्या पोलिसांवर काय कारवाई होणार?

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना जान्हवीच्या आई विजय लक्ष्मी म्हणाल्या, या खटल्याचा तोडगा निघाला असे काही लोक मानत असतील. पण त्या बेजबाबदार पोलिसाच्या कृत्यामुळे आमच्यापासून आमची मुलगी कायमची हिरावली गेली. अपघातासाठी जबाबदार पोलिसाला शिक्षा झालेली नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याला कवडीमोल ठरविणाऱ्या आणि तिच्या मृत्यूची थट्टा करणाऱ्या त्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार?

जान्हवीचे आजोबा सुरी बाबू म्हणाले की, आमच्या वतीने दक्षिण आशिया समुदायाच्या वतीने हा खटला लढवला गेला होता. आम्हाला त्याबाबत काही माहिती नाही. आम्ही फक्त जेव्हा आम्हाला फोनवर घेतले, तेव्हा बोललो. बाकी काम तेथील कार्यकर्ते, वकील आणि जान्हवीच्या मित्रांनी पाहिले.

सुरी बाबू पुढे म्हणाले की, पोलिस अधिकारी केविन डेव्ह याने भरधाव वेगात वाहन चालवून जान्हवीला धडक दिली. त्याच्या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने आमच्या जान्हवीच्या जिवाची काहीच किंमत नाही, असे म्हटले. तसेच केवळ ११ हजार डॉलर्सचा धनादेश देऊन विषय संपवा, असे म्हटले. या विधानामुळे आम्हाला खूप धक्का बसला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!