April 23, 2026 3:50 pm

*’साहेब, आमच्या गल्लीत 2 खून झालेत’, असं म्हणत पोलिसांना फोन करणाराच निघाला खुनी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल अशा पंढरपूरमधील कुंभार गल्ली येथील माय-लेकाच्या दुहेरी खून प्रकरणाचा अखेर 7 महिन्यांनी उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे, ज्याने पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि तपासाचे सल्ले दिले, तोच यातील मुख्य सूत्रधार निघाल्याने खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना शिताफीने अटक केली आहे.

पंढरपुरात काय काय घडलं?

15 जुलै 2025 रोजी कुंभार गल्लीतील सुरेखा संजय जगताप (45) आणि त्यांचा मुलगा लखन संजय जगताप (24) यांचा राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. घटनेच्या वेळी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार नसल्याने पोलिसांसमोर या तपासाचे मोठे आव्हान होते.

तपास भरकटवण्याचा प्रयत्न

आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुरुवातीपासूनच अनेक युक्त्या लढवल्या. खुनाची खबर देणारा आरोपी स्वतःहून पोलिसांना तपासात मदत करण्याचे नाटक करत होता. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथून एकाला, तर दोघांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले.

या हत्याकांडत अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे हत्याकांड वैयक्तिक हेवेदावे, प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली. आरोपीना न्यायालयात हजर केले असून अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सोलापूरचे SP अतुल कुलकर्णी याबाबत बोलताना म्हणाले, पंढरपूरच्या वारीनंतर 16 जुलै रोजी दुहेरी हत्याकांड झाल होतं. एका मुलाचा आणि त्याच्या आईचा मर्डर झाला होता. बंद खोलीत तलवारीने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. आम्ही या प्रकरणाचे सतत पुरावे गोळा करत होतो. खासकरुन फॉरेन्सिक पुरावे मिळाले होते. त्यांचा टीव्ही घरातून गायब झाला होता. आम्हाला आजूबाजूच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर संशय होता. आम्ही सीडीआर वगैरे डेटा गोळा करुन तपास केला. 5-6 महिन्यांनंतर आम्हाला माहिती मिळाली की, यामध्ये 3-4 लोक सहभागी होते. ज्याच्याकडे या मर्डरची माहिती होती, त्याची आम्ही चौकशी केली. त्याचा मोबाईल स्पॉटला होता, त्यानं नवीन सीम कधी घेतलं? अशा गोष्टी तयार करुन आम्ही त्याची चौकशी केली. त्यानंतर न्यायालयीन कोठडीतील आरोपीने सगळी कबुली दिली. यामध्ये चुलत भाऊ सहभागी होते.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!