April 23, 2026 5:26 pm

*परळीतील 21 वर्षीय तरुणी बेपत्ता; पाली पोलिसांत नोंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सुधागड तालुक्यातील परळी येथील एक २१ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. 11) पाली पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली असून पोलीस प्रशासन तिचा कसून शोध घेत आहे.

परळी (चव्हाण आळी) येथील रहिवासी असलेली आर्या सुरेश पवार (वय २१) ही तरुणी मंगळवारी (ता. 10) दुपारी ३ वाजेच्या सुमारास परळी बाजारपेठेतील ‘मॉन्जिनीज केक शॉप’ येथे कामासाठी गेली होती. मात्र, नेहमीची वेळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि कामाच्या ठिकाणी सर्वत्र चौकशी केली, परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर तिचे वडील सुरेश सिताराम पवार यांनी पाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पाली पोलिसांनी मनुष्य मिसिंग रजिस्टर क्र. ०७/२०२६ नुसार नोंद केली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, वरील वर्णनाच्या तरुणीबाबत कोणास काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने पाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

या मुलीचे वर्णन उंची: ४ फूट ७ इंच (अंदाजे) वर्ण: गव्हाळ, बांधा सडपातळ, केस: काळे व मध्यम लांबीचे (चेहरा गोल), पेहराव: बेपत्ता झाली तेव्हा अंगात ‘स्काय ब्ल्यू’ रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि पायात काळ्या रंगाची सॅंडल होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!