April 22, 2026 12:31 am

*समाजविघातक कृत्यांचा रक्तरंजित अंत; सराईत गुन्हेगार राजू कांबळेचा भररस्त्यात खून

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात दीर्घकाळापासून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगारी प्रकरणाचा रविवारी रात्री भीषण शेवट झाला. सराईत गुन्हेगार म्हणून ओळख असलेला राजू तुळशीराम कांबळे (वय ३९) याची जुन्या वादातून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.

या प्रकरणी यश तोमर उर्फ ठाकूर (वय २०) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

राजू कांबळे हा पंचशील नगर परिसरात महिलांची छेडछाड, चोरी, मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे यांसारख्या कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अनेक वेळा त्याच्याविरोधात तक्रारी झाल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजू कांबळे आणि आरोपी यश तोमर यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे समोर आले आहे. या वादातूनच यशने रागाच्या भरात राजूच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत राजू खाली कोसळला आणि रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी यश तोमर याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, हत्येमागील नेमकी कारणे, पूर्वीचा वाद आणि घटनेची पार्श्वभूमी याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!