April 22, 2026 12:33 am

*विद्यार्थ्याची शिक्षिकेला भर वर्गात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका वर्गात एक विद्यार्थी अचानक त्याच्या जागेवरून उठून गणिताच्या शिक्षिकेशी भांडू लागला.

तो आधी शिक्षिकेला थप्पड मारु लागला आणि नंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्गातील इतर विद्यार्थिनी शिक्षिकेच्या बचावासाठी आल्या तेव्हा त्या विद्यार्थ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. गणितात कमी गुण मिळाल्याने नाराज झालेल्या विद्यार्थ्याने वर्गात शिक्षिकेवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामध्ये गणिताच्या शिक्षिका खुर्चीवर आरामात बसलेल्या दिसत आहेत, तर इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समोरच्या बेंचवर बसलेले दिसत आहेत. गणिताच्या शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यांचे पेपर तपासल्यानंतर त्यांना गुण दिले. ही चाचणी २० गुणांची होती आणि काहींना २० पैकी २० गुण मिळाले, तर काहींना कमी गुण मिळाले. वर्गातील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला गणिताच्या शिक्षिकेने २० पैकी १८ गुण दिले, जे त्याला आवडले नाही.

शिक्षिकेवर हल्ला

विद्यार्थी आपल्या जागेवरून उठतो आणि शिक्षिकेवर संतापतो. विद्यार्थ्याचे विचित्र वर्तन पाहून जवळचे इतर विद्यार्थी त्यांच्या बाकावरून उभे राहतात. फ्रेममध्ये जे घडते ते वर्गातील कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते. विद्यार्थी थेट शिक्षिकेकडे जातो आणि तिला पूर्ण ताकदीने थप्पड मारतो. तो तिथेच थांबत नाही; तो एकामागून एक अनेक थपडा मारतो. शिक्षिका निघून जाण्याचा प्रयत्न करताच, विद्यार्थी ठोसे आणि लाथांनी मारहाण करतो.

व्हिडिओचा शेवटचा भाग असा आहे जो पाहून कोणालाही संताप येईल. शिक्षिकेवर हल्ला केल्याचा हा व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे, ज्यावर नेटिझन्सकडून संतापजनक कमेंटस् येत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!