April 24, 2026 1:37 am

*पिस्तुल बाळगणारे गुन्हेगार गजाआड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

खून, खुनाचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे असे गंभीर गुन्ह्यातील दोन कुख्यात गुन्हेगारांना गावठी कट्टा घेऊन फिरताना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

ही कारवाई शनिवारी (दि.७) पंचायत समितीजवळ करण्यात आली. जोहेब शोएब पठाण (२०, रा. शहाबाजार) आणि साहिल ऊर्फ गुड्डू अफसर पटेल (३८, रा. नारेगाव) अशी अटकेतील आरोपींची तर अमन साजिद पटेल (रा. सईदा कॉलनी) असे फरार आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप काळे यांना पंचायत समितीच्या बाजूला मोकळ्या मैदानावर, गटशिक्षण अधिकारी कार्यलयाच्या भिंतीजवळ जोहेब पठाण हा गावठी कट्टा घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह धाव घेत जोहेबला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आढळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पिस्टल हे साहिल ऊर्फ गुड्डू आणि अमन यांनी विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने गुड्डूलाही बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, संभाजी पवार, उपनिरीक्षक संदीप काळे हवालदार संदीप तायडे, कैलास काकड, विजय निकम, विजय घुगे, प्रमोद सुरसे, रोहित जाधव, सागर शेंडे, शाहरुख शेख, अक्षय नाटकर यांच्या पथकाने केली.

पिस्तूलचे राऊंड अमनकडे

जोहेबकडे साहिल आणि अमन दोघांनी पिस्तूल विक्रीसाठी भेटल्यानंतर अगोदर डील कर. त्यानंतर तुला राउंड आणून देतो, असे दोघांनी सांगितले होते. त्यानुसार जोहेब हा गावठी कट्टा घेऊन फिरत होता, असे तपासात समोर आले आहे. सध्या दोघे अटक असून, अमन फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. अमन हा गुड्डूचा जवळचा नातेवाईक आहे. त्यानेच हे पिस्तूल आणून दिल्याचे दोघे सांगत आहेत.

दोघे कुख्यात गुन्हेगार

साहिल ऊर्फ गुड्डू पटेल हा कुख्यात गुन्हेगार असून, पैठण येथील खुनाच्या गुन्ह्यात तो सहा ते सात वर्षे जेलमध्ये राहून आलेला आहे. तर जोहेब याच्यावर खुनाचा प्रयत्न, धार्मिक भावना भडकावणे, हाणामारी असे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!