April 24, 2026 7:59 pm

*केर्लीत नेत्याच्या घरासमोर दंगा, दहशतीचा थरार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह स्टेटस्‌ लावल्याच्या रागातून केर्ली (ता. करवीर) येथील एका गटाने दुसऱ्या गटाच्या स्थानिक नेत्याच्या घरासमोर दंगा करत दहशत माजवल्याची फिर्याद करवीर पोलिसांत दाखल झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केर्ली येथील राजकारणामध्ये चौगले गट आणि पोवार गट असे दोन गट कार्यरत आहेत. पोवार गटातील विश्वनाथ पोवार हे शिंदे सेनेचे जिल्हा परिषदेसाठीचे उमेदवार होते. .

शनिवारी मतदानावेळी या दोन गटांमध्ये किरकोळ वादावादी झाली होती. रविवारी पुन्हा पोवार गटाच्या एका कार्यकर्त्याने मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस लावल्याच्या रागातून चौगले गटातील कार्यकर्त्यांनी पोवार यांच्या घराच्या दारामध्ये येऊन दरवाजावर काठ्या-गज मारून अंगणातील कुंड्या फोडून दहशत माजवली. त्याबाबत हर्षवर्धन पोवार यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीमध्ये दहशत माजवणाऱ्या चौगले गटातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन रंगराव चौगले, सुधीर रंगराव चौगले, अक्षय बाबासाहेब चौगले, शिवाजी बापू चौगले, तानाजी उर्फ सागर बापू चौगले, अथर्व सचिन चौगले, तुषार मोहन पाटील, तेजस शिवाजी चौगले, राजवर्धन कृष्णात चौगले, गजानन चौगले यांच्यासह जमावाने घराच्या दरवाजावर लाथा-बुक्क्या मारून दहशत माजवली व शिवीगाळ केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याबाबत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!