April 23, 2026 4:52 pm

*चिखलीत मिक्सरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.

हा अपघात शनिवारी (ता. ७) सकाळी अकराच्या सुमारास चिखलीतील डायमंड चौक, कुदळवाडी येथे घडला.

वैष्णवी सुजित दिघे (वर २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमा बजरंग ढमाले (वर ३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अमोल सखाराम ठोसर (वय ३६, रा. सोमाटणे फाटा) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर चालक आरोपी बिहारी पांडुरंग जाधव (वय ४१, रा. कालेकॉलनी, आळंदी-चऱ्होली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मेव्हणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी वैष्णवीच्या दुचाकी (वाहन एमएच १४/एफएल ०२५२) वरून जात होत्या. भरधाव वेगात आलेल्या मिक्सर ट्रक (वाहन एमएच १४/एलएल ८८०३) वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. डायमंड चौकातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीला बंदी आहे, असे असताना देखील मिक्सर चालकाने त्याचे वाहन या रस्त्याने आणले. या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला. तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. चिखली पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!