April 23, 2026 10:36 pm

*इराणी महिलेला आश्रय देणे पडले महागात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

धरणगाव येथे इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या कुरेशी शेख रफीक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा (दोघे रा. धरणगाव) या दोघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

यातील शेख अहमद हा आयुर्वेद, युनानी उपचार करणारा असून, तो पाकिस्तानमधील काही क्रमांकांशी संपर्कात असल्याचे आढळून आल्याने त्याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यासाठी पोलिसांनी मोबाईल डाटा काढला असता, तब्बल ९० हजार पानांचा डाटा समोर आला आहे.

व्हीसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर धरणगाव येथे वास्तव्य केल्याप्रकरणी इराणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या महिलेचा व्हिसा (वर्ष २०२२)मध्ये संपला असतानादेखील तिला आश्रय दिल्याप्रकरणी कुरेशी शेख रफीक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी (ता. ३) न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.

इतर यंत्रणांकडून चौकशी

इराणी महिला तरीना मसईला तिच्या मूळ देशात पाठविण्यात येणार असून, तिच्या रवानगीची संपूर्ण तयारी झाली आहे. मात्र, या महिलेस गुरू-पत्नी म्हणून शरण दिल्याप्रकरणी शेख अहमद आणि त्याचा मोठा भाऊ कुरेशी शेख रफीक शेख मुसा या दोघांना अतिरिक्त पोलिस कोठडी पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आयबी, सीबीआय आणि सीआयडीतर्फे या प्रकरणाची चौकशी केली असून, आणखी तपासात काय निष्पन्न होते. ते दस्तऐवजातून समोर येणार असल्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.

नव्वद हजार पानांचा डाटा

अटक केलेल्या दोघांपैकी शेख अहमद हा आयुर्वेद, युनानी उपचार करतो. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आहे. त्यात त्याचा मोबाईल क्रमांक व पाकिस्तानातील काही क्रमांकांवर संपर्क झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल डाटा काढला असता, तब्बल ९० हजार पानांचा डाटा समोर आला. त्यातील संशयास्पद संपर्कासंदर्भात चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने दोन हजार पाने वेगळी काढली असून, त्यातून माहिती एकत्रिक केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!