April 23, 2026 5:15 pm

*पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या १७ वर्षीय मुलीचा करुण अंत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी शिवारात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पायातील पैंजण आणि कपड्यांवरून या मृतदेहाची  ओळख पटली असून, हा प्रकार आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचा पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मूळची परभणीची असलेली १७ वर्षीय अश्विनी हिने १६ जुलै २०२५ रोजी पुण्यातील शिक्रापूर येथून अभिषेक बांगर याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य माढा तालुक्यातील केवड येथील साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आले होते. मात्र, ज्याच्यावर विश्वास ठेवून अश्विनीने घर सोडले, त्यानेच तिचे जगणे असह्य केले.

छळाची भीषण वास्तविकता

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, “स्वयंपाक येत नाही” आणि “काम नीट जमत नाही” या कारणावरून पती अभिषेक आणि सासू सोजरबाई बांगर हे अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या सततच्या जाचाला कंटाळून अश्विनीने १३ जानेवारी २०२६ रोजी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

अश्विनीच्या मृत्यूनंतर आपली चूक लपवण्यासाठी अभिषेक आणि त्याच्या आईने अत्यंत निर्दयी कृत्य केले. त्यांनी अश्विनीचा मृतदेह बैलगाडीत टाकून तुर्कपिंपरी शिवारातील एका शेतात नेला आणि तिथे खड्डा खोदून पुरून टाकला.

२९ जानेवारी रोजी हा मृतदेह उघडकीस आला. प्राण्यांनी मृतदेह उकरून काढल्याने तो अत्यंत विदारक आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. डोके धडावेगळे झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते, मात्र घटनास्थळी सापडलेले पैंजण आणि कपडे पाहून अश्विनीच्या वडिलांनी तिची ओळख पटवली.

पोलिस कारवाई

अश्विनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी तालुका पोलिसांनी पती अभिषेक बांगर आणि सासू सोजरबाई बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीचा असा करुण अंत झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. बार्शी पोलीस या प्रकरणातील तांत्रिक पुरावे गोळा करत असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणा वेगाने काम करत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!