May 14, 2026 3:07 am

*अजितदादांसोबत विमान अपघातात मृत्यू झालेला तो नव्हेच

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळला आहे. अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेडंट पिंकी माळी या पाचही जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या निधनाने अद्यापही महाराष्ट्र हा सावरला नाहीये. सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त करत अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. वैमानिकांचे कौतुक करणाऱ्या पोस्टही शेअर केल्या आहे. कॅप्टन सुमित कॅप्टन यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक पोस्टमध्ये एका तरुण वैमानिकाचा फोटो होता. कॅप्टन कपूर दाखवणारा हा फोटो काही माध्यमांनी शेअर केला होता.

इंडिया टूडेने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की या फोटोमध्ये कॅप्टन सुमित कपूरच्या नावाने कॅप्टन मदनचा फोटो व्हायरल केला जात आहे. लिंकडीनवर साहिल मदान याची प्रोफाइल आहे. यामध्ये जो फोटो सुमित कपूरच्या नावाने व्हायरल केला जात आहे तोच फोटो मदानच्या प्रोफाइलवर आहे. डीएनएने या वृत्तसंस्थेने केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्ट दिसून आले की मृत झालेल्या पायलटचे नाव साहिल मदान लिहिले होते. पोस्टच्या कमेंटमध्ये एका संजम साहनीने लिहिले की कॅप्टन साहिल माझे पती आहे आणि ते विमानात नव्हते असे त्या म्हणाल्या. यावरून हे समोर आले की व्हायरल होत असलेला फोटो हा कॅप्टन सुमित कपूरचा नसून तो कॅप्टन साहिल मदनचा आहे.

विशेष म्हणजे कॅप्टन साहिल मदान, ज्याचा फोटो व्हायरल झाला होता, तो देखील व्हीएसआर एव्हिएशनमध्ये कार्यरत आहे, असे त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून दिसून येते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!