April 20, 2026 5:58 am

*सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडू यांनी भाजपवर मोठा आरोप केला.

राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या ईडी फाईल भाजपकडे असल्याचा दावा.

लातूर येथील प्रचार सभेत त्यांनी खळबळजनक विधान केले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले. त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ‘राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपाच्या इशारावर चालतात. कारण या तीन बड्या नेत्यांच्या ईडीच्या फाईल भाजपकडे अडकल्या आहेत.’, असं मोठं विधान त्यांनी केले. तसंच, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘हा भाजपचा मोठा डाव’, असल्याचा आरोप त्यांनी केला. ते लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘राष्ट्रवादीच्या ३ बड्या नेत्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहेत. आजच्या शपथविधीमुळे अजितदादांबद्दलची सहानुभूती मागे पडताना दिसत आहे. भाजपाने मोठा डाव खेळला आहे. अंत्यविधीला चार दिवस होत नाहीत, त्यामुळे पुष्पगुच्छ घेऊन जायचं की, सांत्वन करायला जायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. शेवटी सुनेत्रा पवार यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कारण या दुःखाच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे एका दृष्टीने धाडस आहे. आणि याच धाडसाने त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी उभं रहावे.’

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याला मोठा धक्का बसला. बारामतीमध्ये २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातामध्ये त्यांचा मृ्त्यू झाला होता. अजित पवार हे बारामती दौऱ्यासाठी विमानाने जात होते. त्याचवेळी त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर शनिवारी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या निधनानंतर बच्चू कडू यांनी शोक व्यक्त केला होता. ‘अजितदादांचं अचानकपणे निधन झालं ही अतिशय दुखद घटना आहे. अतिशय धाडसी, स्पष्ट, परखड, कामाचा माणूस आणि कार्यकर्त्यांसाठी धावणारा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती. अजितदादांच्या या दुःखद निधनाने मोठा झटका बसला.’, असे म्हणत बच्चू कडू यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!