April 20, 2026 2:13 am

शिंदे गटातील नेत्याच्या प्रचारात वाद उफाळला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

रायगड जिल्ह्यातील नेरळ  परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या नेरळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडली. शिंदे शिवसेनेचे नेते व माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या प्रचारादरम्यान वाद निर्माण झाला. याच वादाचे रूपांतर पुढे हिंसाचारात झाले.

हल्ल्यात रिक्षा चालक गंभीर जखमी 

या हल्ल्यात ममदापूर (ता. कर्जत) येथील रिक्षा चालक विशाल हिसाळके याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तीन संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक

प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. मात्र या घटनेत सुरेश टोकरे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळात अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी नेरळ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत.

म्हसळा नगरपंचायतीत शिंदे गटाला धक्का

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश केलेल्या या सात नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल सात नगरसेवकांनी काही काळापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या पक्षांतराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित सातही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!