April 20, 2026 4:20 am

उद्या बारामतीत अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा उपस्थित राहणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे अंत्यसंस्कार बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार आहेत.या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय राज्यातील वरिष्ठ मंत्री, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून, बारामतीत शोकाकुल वातावरण आहे.

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!