April 20, 2026 1:03 am

संपाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात बँका सुरू राहणार की बंद?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आज मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या या संपामुळे बँका आज खुल्या राहणार की बंद, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, आज २७ जानेवारी रोजी देशभरातील बँकांना अधिकृत सुट्टी नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

आज बँका बंद आहेत का?

जर तुम्ही आज बँकेत जाण्याचं नियोजन करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशाच्या अनेक भागांत आज बँकांचं कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे. सामान्यांच्या मनात असा प्रश्न आहे की ही सुट्टी RBI नं दिली आहे का? तर, ही सुट्टी RBI नं जाहीर केलेली नसून बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत होणार आहेत.

 

RBI ने सुट्टी दिलेली नाही

२७ जानेवारी रोजी बँका बंद राहण्याचं कारण कोणतेही सरकारी किंवा RBI द्वारे घोषित केलेली सुट्टी नाही. बँक युनियन्सनी या दिवशी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याच संपामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये बँकिंग कामकाज ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या बँका बंद राहणार?

या संपामध्ये देशातील सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश असेल. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक यांसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. अनेक शहरांमध्ये कर्मचाऱ्यांनी आधीच निदर्शनं सुरू केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय.

 

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (UFBU) हे ९ प्रमुख बँक युनियन्सचे संयुक्त व्यासपीठ आहे. ही संघटना सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही जुन्या खाजगी बँकांच्या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करते. UFBU नं २७ जानेवारी २०२६ रोजी देशभर बँक संप करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी बँक शाखा बंद राहू शकतात आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

संपामागचं मुख्य कारण काय?

बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून ५ दिवस काम (Five-day work week) आणि २ दिवस सुट्टी लागू करावी, ही युनियन्सची सर्वात मोठी मागणी आहे. सध्या बँक कर्मचारी आठवड्यातून ६ दिवस काम करतात आणि त्यांना रविवारची सुट्टी मिळते. याशिवाय सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असतेच, मात्र सर्व शनिवारी सुट्टी मिळावी अशी मागणी युनियन्स करत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!