April 20, 2026 2:13 am

लकी-ड्रॉचा आनंद ठरला अखेरचा; जळगावमध्ये अपघातात आजोबा-नातवाचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जळगाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लकी-ड्रॉची माहिती घेऊन येत असताना देशमुख चुनीलाल राठोड (वय 55 रा. निपाणी तांडा ता. एरंडोल) व त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (वय 6 वर्ष) यांचा अपघातात हृदयद्रावक अंत झाला आहे. तर राठोड यांच्या पत्नी बेबीबाई राठोड (वय 50) या जखमी झाल्या आहेत. हा अपघात काल रविवारी दुपारी बायपासवरील पाळधीनजीक सावदे-रिंगणगाव फाट्यावर झाला. एक महिन्यापूर्वी त्यांनी नवीन कार घेतली होती, आणि त्या कारच्या लकी-ड्रॉची माहिती घेऊन परत येत असताना हा मोठा अपघात झाला.

 

नेमकी बातमी काय?

एक महिन्यापूर्वीच राठोड परिवाराने नवीन कार घेतली होती. त्या कारची लकी-ड्रॉमधील मिळालेल्या बक्षिसाची माहिती घेऊन परत येत असताना भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. निपाणी तांडा येथील देशमुख चुनीलाल राठोड यांनी एका महिन्यापूर्वीच नवीन कार घेतली होती. त्यात लकी-ड्रॉमधून त्यांना काही बक्षीस लागलं होतं, त्याचीच माहिती घेण्यासाठी ते पत्नी बेबीबाई व नातू परेश यांच्यासह दुचाकीने क्रमांक (एम.एच 19 आर 1642) जळगावला आले होते. त्याची माहिती घेऊन परत येत असताना नियतीला काही औरच मान्य होतं आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

 

कारच्या शोरूममधून माहिती घेतल्यानंतर ते तिघेही गावाकडे परतत होते. बायपासवरून ते पाळधीपर्यंत पोहोचल्यानंतर सावदे-रिंगणगाव फाट्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एमएच 05 एम 3248) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भयंकर होती की, दुचाकी पूर्ण कंटेनरच्या खाली दाबली गेली. या अपघातात देशमुख चुनीलाल राठोड व त्यांचा नातू परेश राठोड हे जागी ठार झाले तर बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

नवीन कारचा आनंद महिनाभरच…

राठोड यांनी आपल्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी केली होती. कुटुंबात नवीन कारचा आनंद असताना महिनाभरातच काळाने आजोबा देशमुख चुनीलाल राठोड यांच्यासह नातवाला हिरावून घेतलं. घटनेची माहिती मिळताच त्यांचं कुटुंब मित्र गावातील मंडळी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. वडील व मुलगा गमावलेल्या दिनेश राठोड यांना दुःख अनावर झालं. दोघांचाही मृतदेह बघताच राठोड कुटुंबाने एकच आक्रोश केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!