April 20, 2026 2:13 am

खेळताना तोल गेला, चौथ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून एका सहा वर्ष बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाथर्डी फाटा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

खेळताना अचानक तोल गेला

नरहरी नगर येथे असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळता खेळता अचानक एक सहा वर्षाचा चिमुरडा तोल जाऊन खाली पडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याला दुर्दैवाने आपले प्राण गमावे लागले आहे. काल रविवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कीयांश प्रफुल्ल बेदाडे (वय 6 वर्ष, रा. शिवगंगा रेबिन्यू नरहरी नगर पाथर्डी फाटा, नाशिक) असं या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे.

 

क्रियांश हा आपल्या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील घरातील गॅलरीमध्ये खेळत होता. खेळत असताना अचानक गॅलरी मधून त्याचा तोल गेला आणि तो थेट चौथ्या मजल्यावर खाली जमिनीवर कोसळला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने कीयांश हा गंभीर जखमी झाला होता. घटना लक्षात येताच तातडीने त्याच्या घरच्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनं बेदाडे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

आईने फोडला हंबरडा

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, कीयांश याच्या आईने फोडलेला हंबरडा हा सगळ्यांच्या डोळ्यात चटकन अश्रू आणणारा होता. यश हा आपली आई आणि दोन बहिणी सोबत पाथर्डी फाटा येथे राहत होता तर क्रियांश याचे वडील हे कामानिमित्त मनमाड येथे वास्तव्यास असतात. कियांश हा बेदाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी अपघाती मृत्यू होणं हे त्याच्या घरच्यांसाठी सहन न होणारा धक्का आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे आकस्मात व्यक्तीची नोंद करण्यात आली असून इंदिरानगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!