April 23, 2026 3:49 pm

सासवड येथे निवडणूक कर्तव्यात कसूर…सहाय्यक निबंधकाविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें
सासवड प्रतिनिधी : निलेश भुजबळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकृत कर्तव्यावर गैरहजर राहिल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी *गुन्हा रजिस्टर नं. २७/२०२६ दाखल असून कलम १३४* अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचायत समिती पुरंदर येथील सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश दिनकर थोरात यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक १४ जानेवारी रोजी मतदान केंद्र सुविधा पथकात नोडल अधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या थोरात यांच्यासोबत आरोपी *यशवंती मेश्राम, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पुरंदर* यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दिनांक *१४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून* आरोपी यशवंती मेश्राम या नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिल्या. त्यांच्याशी दूरध्वनी व व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या लेखी परवानगीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानुसार आरोपीविरुद्ध *लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ चे कलम १३४ अन्वये गुन्हा* नोंदविण्यात आला असून पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!