April 19, 2026 9:54 pm

नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा कहर; काळ्या घोड्यांच्या छळाचा धक्कादायक प्रकार उघड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली प्राण्यांवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळ्या घोड्यांच्या नालामुळे नशीब बदलते, भरभराट होते, या अंधविश्वासातून दोन काळ्या घोड्यांचा निर्दयपणे छळ करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

 

शहरात काही संशयित व्यक्ती दोन काळे घोडे घेऊन फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे मंगलरूप गोशाळा टीमने गेल्या चार दिवसांपासून तपास सुरू केला होता. अखेर एबीपी सर्कल परिसरात हे संशयित सापडून आले.

 

तपासादरम्यान जागेवरच लोखंड गरम करून घोड्यांच्या पायात नाल ठोकले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. अंधश्रद्धेमुळे या नालांना मोठी मागणी असून, काळ्या घोड्यांच्या नालामुळे आर्थिक भरभराट होते, असा गैरसमज पसरवून नागरिकांकडून नाल कोणत्याही किमतीत विकले जात असल्याचेही समोर आले आहे.

 

या अमानुष प्रकारामुळे घोड्यांना तीव्र वेदना सहन कराव्या लागत असून, हा प्रकार प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे सरळ उल्लंघन आहे. मंगलरूप गोशाळा टीमने संशयितांचा समाचार घेत त्यांना समज दिली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान, अंधश्रद्धेच्या नावाखाली प्राण्यांवर होणारा छळ थांबवण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे, अशा प्रकारचे प्रकार दिसून आल्यास तात्काळ प्रशासन किंवा प्राणी संरक्षण संस्थांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!