April 20, 2026 12:22 pm

भक्तिमय माघी गणेश जन्माचा रंगतदार सोहळा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

माघी गणेश जन्मानिमित्त ह भ प निवेदिता मेहेंदळे यांचे दिनांक 22 -1-26 रोजी दाशुभूजा गणपती मंदिर सहकार नगर पुणे येथे कीर्तन झाले. अतिशय खुमासदार आणि आपल्या खड्या आवाजाने रसिकांना आणि कीर्तन प्रेमी उपस्थितांना मेहेंदळे यांनी जागीच खिळवून ठेवले.

 

गुरु ऐसा पाठीराखा हा पूर्वरंग आणि माघीगणेश जन्मख्यान मेहेंदळे यांनी भावपूर्ण सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रामुग्ध केले. मेहेंदळे यांना तबल्यावर श्रीकांत खळदकर तर संवादिनीवर साहिल पुंडलिक व सहगायन तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी अशी साथ लाभली. माघी गणेश जन्मनिमित्ताने भाविकांनी मंदिरात खूप गर्दी केली होती.

 

यात प्रथम राग हंसध्वनी मधील वातापी गणपती भजेहम ने मैफालीस प्रारंभ झाला त्या नंतर ओंकार प्रधान, सुर निरागस हो, तया थेऊरला, बालभक्ता लागी, रंजणगावाला, गणनायकाय, तुज मागतो आणि रचिल्या रुशीमुनिंनी ही भैरवी संपूर्णपणे तन्मयी यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याच प्रमाणे साहिल पुंडलिक यांनी संवादिनी साथ खुमासदारपणे केली आणि प्रथम तुला आणि तू सुखकर्ता ही गणेशगीते सादर केली. तसेच तबल्यावर निवेदिता मेहेंदळे यांची साथ लाभली होती. अनिकेत चंद्रकांत कुलकर्णी यांनी दृकश्राव्यफीत नियोजन आणि ध्वनीसंयोजन केले.टाळची साथ शमिका खळदकर यांनी केली.तसेच निवेदन निर्मला जगताप यांनी केले. रसिकांनी खूप गर्दी करत उत्साहात गणेश गीतांचा आनंद लुटला यावेळी नवभारतचे उपाध्यक्ष औदुंबर धनवट,तसेच दशभूजा मंदिराचे श्रीकांतदादा खळदकर यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!